Pune : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात भरधाव (Pune ) ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महादेव बापू पिंगळे (वय 25, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

Sports News : धावपटू प्रिया पाडाळे हिला राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार महादेव मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. नवीन कात्रज बोगद्यात सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार महादेवला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. दुचाकीस्वार महादेवचा उपचारांपूर्वीच (Pune ) मृत्यू झाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.