Pune : गुंडांच्या टोळीकडून तरुणावर तलवार हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – गुंडांच्या टोळीने तरुणावर तलवारीने वार करत त्याला (Pune) जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात  तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत चेतन मारुती शेडगे (वय 24, रा. रामनगर, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी गौरव संजय शेळके (वय 21, रा. वारजे), अभिषेक नवनाथ संकट (वय 19, रा. रामनगर, वारजे), सचिन शंकर दळवी (वय23, रा. दांगट पाटीलनगर) या तिघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार ओंकार मांढरे, रोहन पाटोळे, साहील बल्लाळ, आमिश धावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत.

Today’s Horoscope 19 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन शेंडगे आणि त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे हे रविवारी (दि.16) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रामनगरमधील प्रणव सुपर मार्केटजवळ बसले होते. त्यावेळी आरोपी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन तेथे आले. सचिन दळवी याने फिर्यादीला ‘अण्णा डोळसे कोठे आहे’, असे विचारले. त्यावर फिर्यादीने माहिती नाही, असे उत्तर दिले. त्यावर आरोपींनी फिर्यादीच्या हातावर आणि कमरेवर तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा मित्र कृष्णा शिंगाडे (Pune) याने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.