Talegaon Dabhade : टेम्पोवर कार आदळून एकाच कुटुंबातील सहाजण जखमी ; चार गंभीर

एमपीसी न्यूज- समोरून येणाऱ्या टेम्पोला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मारूती अल्टो कारने रस्ता दुभाजक तोडून धडक दिली. या अपघातात मोटारीतील एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि 15) सकाळी सव्वासहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील सेवाधाम हाॅस्पिटलजवळ झाला.

दुर्गा आशिष गजभिये (वय 31) वर्ष, प्रणय घनश्याम गजभिये (वय 28), आशिष घनश्याम गजभिये (वय 31), दीक्षा घनश्याम गजभिये (वय 26), अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून घनश्याम गजभिये (वय 60 ) रंजना गजभिये (वय 54) सर्वजण रा. यवतमाळ रोड, बडनेरा, अमरावती हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजभिये कुटुंबीय मुंबईवरून एक कार्यक्रम उरकून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाने तळेगाव स्टेशन मार्गे निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. पहाटे मॉर्निग वाॅकला गेलेले विजय उडगिरी, संतोष पवार, सचिन महाजन, सुरेश ओझरकर यांनी या अपघाताचा आवाज ऐकून तातडीने मोटारीकडे धाव घेतली. अडकलेल्यां प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.