Vadgaon Maval : सहकार भारतीचा स्थापना दिवस उत्सहात

एमपीसी न्यूज – ‘बिना संस्कार नही सरकार’ हे ब्रीद वाक्य घेवून सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सहकार भारती या संस्थेचा स्थापना दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

मावळ तालुका सहकार भारतीच्या वतीने तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या अध्य्क्षेतेखाली वडगाव येथील ऐश्वर्या लक्ष्मी नागरी पतसंस्था येथे सहकार भरतीचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारी सदस्य संजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सहकार भरतीचे संस्थापक कै. लक्ष्मणराव इनामदार आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अॅड. रविंद्र दाभाडे, अॅड. श्रीराम कुबेर, अप्पाराव एनापर्थी, शेखर गुंड, ल्क्ष्मण माने, राजेश ढोरे, विकास शेलार आदी उपस्थितीत होते.

संजय कुलकर्णी यांनी सहकार भारती स्थापनेचा इतिहास कार्यकर्त्यांना सांगितला. ११ जानेवारी १९७८ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचा देशभर विस्तार झाल्याचे त्यांनी सांगितले. सहकार ही भारतीय संस्कृती आहे. सहकारमध्ये देशाच्या विकासाची क्षमता असून महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य आहे. काही सहकारी संस्थांमुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असून सहकारात सुसंस्कारित कार्यकर्त्यांना आणणे गरजेचे आहे. सहकार संस्थाच्या समस्या शासन दरबारी मांडणे, त्याची सोडवणूक करून घेणे, असे कार्य सहकार भारती करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सहकार भारती जिल्हा संघटक कैलास भेगडे यांनी प्रास्ताविक केले. सचिव संजय गायकवाड यांनी तालुक सहकार भारतीच्या वृतांत दिला. ऐश्वर्या लक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा पद्मा ढोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. सहकार भरतीचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.