Pimpri : व्हायब्रण्ट एचआरतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त साकुर्डी-चासकमान येथे विविध सामाजिक उपक्रम

एमपीसी न्यूज-व्हायब्रण्ट एच आर पुणे या संस्थेमार्फत साकुर्डी-चासकमान येथे मोफत वैद्यकीय चिकीत्सा आणि औषध वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील मुलीं व गावातील महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी या विषयावर जनजागृती करण्यात आली. सोबत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

या उपक्रम अंतर्गत साकुर्डी गावातील डोंगर पाड्यांमध्ये 120 हुनअधिक ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला व्हायब्रण्ट एच आर चे 50 हुन अधिक सभासद उपस्थित होते. हा कार्यक्रम साई सेवा रुग्णालय, चाकण यांच्या सहयोगाने पार पडला. यावेळी सरपंच ज़िल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय रोपळेकर, अनिल उबाळे, संपत पारधी, बाळू केदारी, दीपक खोत यांनी परिश्रम घेतले. दीपक पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.