BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : भजन स्पर्धेत मुळशी धरण विभाग प्रथम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- शिवसेना लोणावळा शहर व कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत मुळशी धरण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मागील पाच वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

यावेळी लोणावळा विभागाचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक बी.अार.पाटील, शिवव्याख्याते हभप धर्मराजमहाराज हांडे, हभप संतोषमहाराज बेडेकर, शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष विलास बेडेकर, नारायण पाळेकर, मारुती खोले, गणेश चव्हाण, नगरसेवक देवीदास कडू, सरपंच रामभाऊ सावंत, चंद्रकांत भोते, पोपट राक्षे, तालुका संघटक सुरेश गायकवाड, बबनराव अनसुरकर, सुरेश टाकवे, शंकर जाधव, जितेंद्र राऊत, सुभाष खोले, माजी सभापती सौम्या शेट्टी, नगरसेविका अर्पणा बुटाला व जयश्री काळे, हभप दीपक हुंडारे, हभप निवृत्ती मराठे, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत मेणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख ज्ञानेश्वर जांभुळकर यांनी केले भजन स्पर्धेचे नियोजन सुनील इंगुळकर व विशाल पाठारे यांनी केले.

भजन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

मुळशी धरण विभाग (प्रथम), भैरवनाथ भजनी मंडळ कुसगाव (द्वितीय), ज्ञानेश्वर भजनी मंडळ शेटेवाडी (तृतीय), शिवगोरक्ष भजनी मंडळ औढे (उत्तेजनार्थ) यासह उत्कृष्ट तबलावादक म्हणून कुमार शौर्य तर उत्कृष्ट गायिका म्हणून कुमारी शरयू निवृत्ती मराठे यांना सन्मानित करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

.