Lonavala News : चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : शिवसेना आणि युवा सेना प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने रायवूड उद्यान, लोणावळा येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच गेल्या वर्षी पार पडलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही यावेळी उत्साहात पार पडला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला परीक्षक म्हणून दत्ता थोरात, बोंद्रे, चंद्रकांत जोशी आणि नितीन तिकोणे यांनी सहकार्य केले.

या प्रसंगी पाटण ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य विजय तिकोणे, प्रविण तिकोणे, संतोष येवले, बंटी शिळवणे व कुरवंडे ग्रामपंचायतीच्या सदस्या चंदाराणी जितेंद्र राऊत यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, युवासेना मावळ विस्तारक राजेश पळसकर, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, महाराष्ट्र शिवकामगार सेना अध्यक्ष खालीद मामू, वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, युवासेना अधिकारी विश्वजित बारणे, अतुल राजुरकर, नगरसेवक शिवदास पिल्लै, नगरसेवक माणिक मराठे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, माथाडी कामगार सेना तालुका अध्यक्ष मधुकर पवार, शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज खोले, तालुका उपाध्यक्ष नरेश काळवीट, युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, उपशहरप्रमुख मनेष पवार, उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे, रामभाऊ थरकुडे, विठ्ठल भिलारे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, महिला आघाडी उपशहर संघटक प्रभा आकोलकर, विभागप्रमुख कमर अन्सारी, रविंद्र टाकळकर, उल्हास भांगरे, संजय शिंदे, उपविभागप्रमुख प्रशांत आजगेकर, विशाल गावडसे, विभाग संघटक विनोद पिलाणे, रोमेल फर्नांडिस, मंगेश येवले, परेश बडेकर, शाखाप्रमुख विनायक टाकवे, जितेंद्र ठोंबरे, संतोष मेंढरे, युवासेना विभाग अधिकारी नितीन देशमुख, नितीन खांडभोर, सोमनाथ मावकर , शक्ती कुमावत, धीरज घारे आदी उपस्थित होते

स्पर्धेच आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना मावळ समन्वयक शाम सुतार, शहर समन्वयक जयवंत दळवी, शहर संघटक सुभाष डेनकर, विभागप्रमुख बाळासाहेब मोहोळ, विभाग संघटक शेखर कारके उपविभागप्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख सागर भोमे, युवासेना उपशहर अधिकारी धीरज मोहोळ, विद्यार्थी सेना उपशहरसंघटक दिनेश यादव, गटप्रमुख कल्पेश ठोंबरे, उपशाखासंघटक संतोष खांडभोर आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.