Pune : कसबा मतदारसंघातील उबाठा पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघातील (Pune) उबाठा गटाचे पदाधिकारी सागर घोलप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील पक्ष संघटन बळकट करण्यासाठी व संघटना बांधणीसाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात शहरात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात येणार आहे, असे भानगिरे यांनी सांगितले.

यावेळी युवासेना राज्य सचिव किरण साळी,उपशहरप्रमुख गौरव साईनकर,सुधीर कुरुमकर युवासेना सह संपर्क प्रमुख अविनाश खेडेकर, युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे व अन्य पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Dr. Amol kolhe : रेडझोन, शेतकऱ्यांचा आक्रोश, बिबट प्रजनन नियंत्रण प्रश्नांकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी वेधले सरकारचे लक्ष

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली. राज्यात महायुती सरकारचे कामकाज उत्तमरित्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune) यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी हे सरकार उपयुक्त असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.