Pune : शंकरराव ढमाले यांच्या मार्गदर्शनात मलाही कबड्डीचे धडे शिकायला मिळाले – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पूना ॲमेच्युअर्स संघाचा मी स्वतः खेळाडू (Pune) राहिलेलो असल्याने या संघाशी माझं भावनिक नातं राहिलेलं आहे. कै. शंकरराव ढमाले यांच्या मार्गदर्शनात मलाही कबड्डीचे धडे शिकायला मिळाले होते. त्यांच्याच स्मरणार्थ नावाच्या स्पर्धेमुळे त्यांच्या आठवणींचा पटच उभा राहिला, अशा शब्दांत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आठवणींना उजाळा दिला.

शिवसेना कसबा विधानसभा मतदार संघ आणि पूना ॲमेच्युअर्स संघाच्या वतीनं कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित राहून खेळाडूंशी संवाद साधला. शिवाय सामन्याची नाणेफेक करुन सामन्याचा प्रारंभ केला.

Dr. Amol kolhe : रेडझोन, शेतकऱ्यांचा आक्रोश, बिबट प्रजनन नियंत्रण प्रश्नांकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी वेधले सरकारचे लक्ष

कबड्डीसारख्या अस्सल देशी खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा (Pune) प्रकारच्या स्थानिक पातळीवर स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे संयोजकांचे कौतुक करावं तेवढं थोडी कमी आहे. याबद्दल उमेश गालिंदे आणि सर्व पूना ॲमेच्युअर्सचे संघाच्या खेळाडुंचे मन:पूर्वक अभिनंदन करीत असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.