Pimpri : राज्यातील प्रदूषित नद्यामध्ये पवना, इंद्रायणीचा समावेश

0 107

एमपीसी न्यूज – राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नद्यांचा समावेश आहे. या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने मेसर्स एचसीपी डिजाईन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. या ठेकेदार संस्थेची नेमणूक केली आहे.

HB_POST_INPOST_R_A

पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. शहरातून वाहत असलेले पवनेचे पात्र 18 किलोमीटर असून इंद्रायणीचे 16 किलोमीटर आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना व इंद्रायणी या गटारगंगा झाल्या आहेत. पालिकेचे शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात आहे. कचराही टाकण्यात येतो. यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच नद्या प्रदूषित राहिल्या असल्याचा आरोप, पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. नद्यांची प्रदूषणातून मुक्तता करण्यासाठी पाऊले उचलण्याची अपेक्षा आहे. प्रदूषित नद्या सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, शहराच्या हद्दीतून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. या दोन्ही नद्यांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी अपेक्षित उपाययोजनांची चाचपणी करण्यासाठी मेसर्स एचसीपी डिजाईन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. या ठेकेदार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: