Crime News : जमीन देण्याच्या बहाण्याने एकाची 9.80 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एकाची 9.80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत (Crime News) पीडीत दत्तात्रय पाटील, (वय 47, रा. चिखली प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

Crime News : बिल्डरने 35 लाख रुपये घेऊनही फ्लॅटचा ताबा व भोगावटा प्रमाणपत्र दिले नाही

 

यशवंत देसाई, (वय 50 वर्षे, रा. शाहूनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 2009 ते 2013 पर्यंत घरखर्चासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी एकूण 4.30 लाख रुपये घेतले. तसेच जमीन खरेदीसाठी 5.50 लाख रुपये चेकच्या स्वरूपात घेऊन फिर्यादी यांना (Crime News) जिल्हा तुकडी कोल्हापुर, पोट तुकडी, तहसील भुदरगड, निबंधक भुमापन गट क्रमांक 16 मधील आरोपीचे क्षेत्र 39.46 आर खरेदी करून देतो म्हणून त्यांच्याबरोबर करारनामा केला. असे एकूण 9.80 लाख रुपये ची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन तिचा अपहार केला व फिर्यादीची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.