Nowcast: पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यातील काही भागात मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार  पाऊस

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुढील तीन तासात पुणे जिल्ह्यातील काही भागाला पाऊस झोडपणार आहे. तसा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पुढील तीन तासात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर तालुक्यांच्या घाट क्षेत्रासह पुणे शहर आणि लगतचा परिसर, पिंपरी-चिंचवडमधील अनेक ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे. तर, काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता वर्तविली आहे. घाटाजवळ पावसाचे प्रमाण जास्त असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

 

5 जुलैपासून पाऊस जोरदार सुरु आहे. दिवसभर आणि रात्रीही पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. सतत होणा-या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या रेड अलर्टमुळे शाळांनाही सुट्टी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.