India Tour Of West Indies : वेस्ट इंडीजविरुध्द भारतीय टी 20 संघ जाहीर;कोहली – बुमराह यांना वगळले

एमपीसी न्यूज – भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुध्द सामने खेळत आहे परंतु तो लवकरच वेस्ट इंडीडविरुध्द मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात हा दौरा आहे. दरम्यान, (India Tour Of West Indies) याच मालिकेतील टी- 20 सामन्यांसाठी नुकताच भारतीय संघ जाहिर करण्यात आला आहे.

 

 

वेस्ट इंडीजविरुध्द जाहिर करण्यात आलेल्या संघातून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना संघातून वगळण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच देण्यात आले आहे. त्याशिवाय के.एल. राहूल आणि कुलदीप यादव यांना संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यांच्या फिटनेसवर ते दोघे अंतिम 11 मध्ये असणार की नाही हे ठरणार आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (India Tour Of West Indies) नुकताच व्टिटरवर संघ जाहीर केला आहे.

 

 

 

या दौर्यात भारतीय संघ आधी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच टी 20 सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवीले जातील.29 जुलै रोजी पहिला टी 20 ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे खेळविला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी 20 सामना वार्नर पार्कवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचे दोन टी 20 सामने 6 आणि 7 आगस्ट रोजी फ्लोरिडा येथे होणार आहेत.

 

Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले नऊ मोठे निर्णय

 

 

 

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन,केएल राहुल, सूर्यकुमार यादव,दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक,ऋषभ पंत, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर आश्वीन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.