Dehu Road News: देहूरोडमधील एका घरातून 2.20 लाख रुपये सोन्याच्या दागिन्यांची चोरी

एमपीसी न्यूज – देहूरोडमधील एका घरातून 2.20 लाख रुपये सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी घडली.

 

डॅनियल पॉल, (वय 27, बापदेवनगर, देहूरोड) यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : जमीन देण्याच्या बहाण्याने एकाची 9.80 लाख रुपयांची फसवणूक

 

2 ते 6 जुलै दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरातील उघड्या दरवाज्या वाटे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आतमध्ये प्रवेश केला. त्याने 2 लाख 20 हजार 924 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.