Crime News : बिल्डरने 35 लाख रुपये घेऊनही फ्लॅटचा ताबा व भोगावटा प्रमाणपत्र दिले नाही

एमपीसी न्यूज – बिल्डरने 35 लाख रुपये फ्लॅटची किंमत घेतली पण फ्लॅटचा (Crime News)  ताबा व भोगावटा प्रमाणपत्र दिले नाहीत. तसेच उपनिबंधक कार्यालयास खोटी माहिती पुरवून सोसायटी स्थापन केली आहे. याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

बिल्डर सुरेश गामी (गामी ग्रुप), सोसायटीचे खजिनदार अजिंक्य ताम्हाणे, अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सेक्रेटरी सचिन साळुंके, सदस्य संदिप वामण, सदस्य वसूल व इतर पदाधिकारी ही आरोपी आहेत.

 

 

 

 

फिर्यादीने सन 2013 मध्ये राधाकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ए विंग फ्लॅट क्रमांक 102, तिरुपती चौक, इंद्रायणी नगर, भोसरी येथे खरेदी केला आहे. फिर्यादी यांनी फ्लॅट खरेदी केल्यानंतर अद्यापपर्यंत ताबा व बोगवटा प्रमाणपत्र न देता सदरची  इमारत अनधिकृत ठेवून फिर्यादी यांची 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच आरोपी यांनी बिल्डरशी संगनमत करून (Crime News)  उपनिबंधक कार्यालयास खोटी माहिती पुरवून सोसायटी स्थापन केली.त्यामुळे आरोपिंच्या विरोधात मोफा ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.