PCMC Smart City: ‘पीएम-वाणी’ योजनेतंर्गत वायफाय सुविधा!

एमपीसी न्यूज – शहरातील नागरिकांना व्यवसाय करणे सुलभ जावे, स्थानिक दुकाने, लहान आस्थापनांना वाय-फाय प्रदाते होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीच्या (PCMC Smart City) उत्पन्नात वाढ होण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत पीएम-वाणी योजनेतंर्गत शहरातील नागरिकांना 5G वाय-फाय सेवा देण्यासंदर्भात संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिका-यांनी स्मार्ट सिटीच्या अधिका-यांशी चर्चा केली. त्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.

 

‘सर्वांसाठी ब्रॉडबँड’ कार्यान्वित करण्यासाठी सार्वत्रिक ब्रॉडबँड प्रवेश सुरक्षित करण्यासाठी “राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन” किंवा “राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियाना” ची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रांतील सर्वांगीण वाढीसाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी हा महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण-शहरी आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील डिजिटल भेद दूर करण्यासाठी देशभरात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सक्षम करणे आवश्यक आहे. (PCMC Smart City) यामुळे सुशासन, पारदर्शकता, आर्थिक समावेशन आणि व्यवसाय करणे सुलभ होईल. यामुळे विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये नागरिकांचा सामाजिक-आर्थिक विकास झाला आहे. या अनुषंगाने, भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत पीएम-वाणी योजनेतंर्गत प्रस्ताव स्मार्ट सिटीला प्राप्त झाला असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक सुसज्ज वायफाय व्यवस्था उभी करून मनपा मुख्य इमारत, सर्व क्षेत्रिय कार्यालये, मनपा हॉस्पीटल, गार्डन तसेच आयसीसीसी आदी ठिकाणी संपूर्ण शहर जोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण 270 ठिकाणी सिटी वाय फाय बसविण्यात आलेले आहेत. या प्रकल्पातंर्गत वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम-वाणी)च्या फ्रेमवर्क अंतर्गत सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून ब्रॉडबँडचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे मंजुर असलेला प्रकल्प जोडला जावा, याबाबत दूरसंचार विभाग विचाराधीन आहे. मजबूत डिजिटल कम्युनिकेशन आधारभूत संरचना तयार करण्यासाठी पीएम-वाणी फ्रेमवर्क सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट प्रदात्यांच्या माध्यमातून ब्रॉडबँडची तरतूद आहे. यामध्ये पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ), पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर (पीडीओए), ॲप प्रदाता आणि सेंट्रल रजिस्ट्री सारख्या घटकांचा समावेश देखील आहे.

 

 

अंतिम-माईल सार्वजनिक वाय-फाय प्रदात्यांना कोणत्याही परवान्याची, नोंदणीची आवश्यकता नाही आणि त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्ज मिळाल्यानंतर 7 दिवसांत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पीएम-वाणी फ्रेमवर्क अशा ॲप प्रदात्यांना देखील प्रोत्साहित करेल जे उपयोगकर्त्यांची नोंदणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रदान करतील. (PCMC Smart City) सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट्सच्या प्रसारामुळे लहान आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी रोजगार वाढेल आणि त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होईल. पीडीओंना बँडविड्थ विकून दूरसंचार आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना देखील फायदा होईल.

 

स्मार्ट सिटीचे सीईओ  राजेश पाटील यांच्या समवेत नुकतीच बैठक पार पडली. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपमहासंचालक विक्रम मालविया, पुणे विभागाचे टेलिकॉम अधिकारी जयकुमार थोरात, स्मार्ट सिटीचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांच्यासह सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.

पीएम-वाणी वाय-फाय वर ब्रॉडबँड कसा वापरायचा?

सार्वजनिक वाय-फाय द्वारे ब्रॉडबँडचा उपयोग करू इच्छिणाऱ्या संभाव्य उपयोगकर्त्याला संबंधित ॲप डाउनलोड करणे, प्रमाणीकरण करणे आणि नंतर कोणत्याही सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटवर ब्रॉडबँडचा उपयोग करणे गरजेचे आहे. उपयोगकर्ता सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटपर्यंत पोहोचल्यावर मोबाइल फोनवरील ॲप विविध उपलब्ध नेटवर्क दर्शवेल. त्यानंतर उपयोगकर्ता त्याच्या आवडीचे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क निवडू शकतो, रक्कम देऊ शकतो – ऑनलाइन किंवा व्हाउचरच्या माध्यमातून – आणि शिल्लक संपेपर्यंत नेटवर्क वापरू शकतो.

 पीएम-वाणी योजनेचे फायदे…

‍कोणतेही गावपातळीवरील उद्योजक (VlE), किराणा दुकानांचे मालक, चहाचे स्टॉल, किरणाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, रेस्टॉरंट मालक इ. सर्व PDO होऊ शकतात आणि Wi-Fi वर इंटरनेट ब्रॉडबँड विकणे सुरू करू शकतात. ‍विक्रेत्यांना आपल्या दुकानांच्या आवारात स्टॉक वाय-फाय ऍक्सेस पॉईंटमध्ये Wi-Fi वर इंटरनेट ब्रॉडबँड विकता येईल. यासाठी कोणत्याही नोंदणीची आवश्यकता नाही. इंटरनेट विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळेल. फूटफॉल वाढल्याने विद्यमान व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.