Pune : टेकड्या वाचविण्यासाठी पुणेकर एकवटले; शनिवारी बैठक

एमपीसी न्यूज – पुण्याचे भुषण असलेल्या टेकड्या वाचविण्यासाठी पुणेकर एकवटले आहेत. मागील सहा महिन्यांपासून बाणेर-पाषाण टेकडी विकास व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली धोक्यात आली आहे. पाषाण-बाणेर टेकडीसह पुण्यातील सर्वच टेकड्या वाचविण्यासाठी उद्या (शनिवारी)बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते, स्मार्ट सिटी, पुणे महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, टेकडी वाचवण्यासाठी प्रयत्न करणा-या संस्था आणि नागरिक या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिरात शनिवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मागील सहा महिन्यांपासून बाणेर-पाषाण टेकडी विकास व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली धोक्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी एप्रिलमध्ये टेकडीफोड थांबवली होती. परंतु, 15 जून पासून परत मागील बाजूने स्मार्ट सिटी अंतर्गत फोडणे चालू केले. नागरिकांनी एकत्रित येऊन ते तूर्तास थांबवणे भाग पाडले. मात्र, अंतिम निर्णय नागरिक व संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी घेण्यात येणार येईल.

जर आपण जास्त संख्येने या बैठकीत उपस्थित राहलो नाही. टेकडीला फोडू नका आहे. त्याच नैसर्गिक स्थितीत जंगल ठेवा ही भूमिका मांडली नाही. तर, कदाचित भविष्यात टेकडी असेल किंवा नाही सांगता येणार नाही. आणि यासाठी तुम्ही, आम्ही जबाबदार असू, पुढील पिढी आपल्याला जाब विचारल्यावाचून राहणार नाही त्यावेळेस आपल्याकडे उत्तर नसेल. त्यामुळे बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.