Hinjwadi: ‘आयटी पार्क’मधील वाहतूक, रस्त्यांसह विविध समस्यांचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक, रस्ते व विविध समस्यांचा पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, यांच्यासग विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, हिंजवडी, माणचे ग्रामस्थ उपस्थित होते.

  • सुस ते नांदे चांदे रस्ता, घोटवडे फाटा ते हिंजवडी टप्पा 3 टी जंक्शन, वाकड येथील सर्व्हिस रोड पूल, हिंजवडी -माण येथील वाहतूक समस्या, प्रलंबित रस्त्यांची कामे, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्न, प्रमुख पायाभूत सुविधा, पार्किंग, वाहतूक व सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन व विविध अडचणीसंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.