Pimpri : शिवजयंती निमित्त अवघ्या 10 रूपयात घ्या ‘रयतेचा राजा शिवाजी’ पुस्तक
एमपीसी न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने अंशुल प्रकाशनने शिवजयंती निमित्त फक्त १० रूपयात ‘रयतेचा राजा’ हे पुस्तक सुपर सवलतीत उपलब्ध केले आहे. ही विशेष व खास ऑफर फक्त शिवजयंती पुरती मर्यादित आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते 68 पानांच्या या पाॅकेट बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची ओळख चित्र व माहितीच्या माध्यमातून उलगडली आहे. शाळा, महाविदयालये, युवक, युवती यांना डोळयासमोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली असल्याचे अंशुल प्रकाशनचे विजय जगताप यांनी सांगितले.