Maval News: मावळातील प्रलंबित पाणीयोजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्वरित सुरू करावीत- सुनील शेळके
एमपीसी न्यूज – मावळातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
‘प्रलंबित पाणीयोजनांचे काम प्राधान्याने पूर्ण करणार’महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. ज्या योजनांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रलंबित आहे त्या तात्काळ देण्यात येतील. व सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.– सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण