Maval : कोथुर्णे येथील पीडित मुलीला न्याय मिळाल्याचे समाधान, पीडितेच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ देणार – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – कोथुर्णे येथील चिमुकलीचे (Maval) अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली व पीडित मुलीला न्याय मिळाला, याचे सर्व मावळवासीयांना मनापासून समाधान आहे. आरोपीने वरिष्ठ न्यायालयाकडे अपील केले तरी शिक्षा कायम राहावी, यासाठी आपण पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहू, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

मावळ तालुक्यातील (Maval) कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर पुरावे नष्ट केल्याबद्दल त्याच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Mahalunge : सहकारी कामगारावर चाकूने वार; एकास अटक

न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार शेळके म्हणाले, कोथुर्णे येथील घटना ही अत्यंत निंदनीय व दुर्दैवी होती. संपूर्ण मावळ तालुक्यात या घटनेचे तीव्र (Maval) पडसाद उमटले होते. पीडित मुलीला लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी समस्त मावळवासीयांच्या वतीने आपण केली होती. पोलीस खाते व राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यायालयात चांगली बाजू मांडली. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा झाली, याचे समाधान मला व मावळातील तमाम जनतेला, माता-भगिनींना आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अपप्रवृत्तींवर वचक बसेल व यापुढे मावळात अशा प्रकारची कोणतीही निंदनीय घटना घडणार नाही, असा विश्वास वाटतो.

आरोपीने या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली, तरी त्याची शिक्षा कमी होऊ नये, यासाठी आपण पीडितेच्या कुटुंबाला शेवटपर्यंत लागेल ते सहकार्य करणार आहोत, असेही शेळके म्हणाले.

पीडित मुलीच्या कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी देखील आपण पाठपुरावा करणार आहोत, अशी माहितीही आमदार शेळके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.