Pune : मोदी सरकार रडीचा डाव खेळत आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – सक्तवसुली संचलनालय (Pune), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानंतर (सीबीआय) आता प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून मोदी सरकारने बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी केली आहे. सरन्यायाधीशांना वगळून निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचा कायदा बदलून मोदी सरकारने आपल्या मर्जीतील व्यक्तींची आयुक्तपदी नियुक्ती केली. अशा निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल उपस्थित करून निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. तसेच पुण्यातून रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचा विसश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड या वेळी उपस्थित होते.

देशातील प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला प्राप्तिकर भरावा लागत नाही. पण, पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा ताळंबेद आणि व्यवहार हे पक्षांना व्यवहार निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात. 2017-2018 मध्ये काँग्रेसला काही देणग्या मिळाल्या होत्या. केरळमधील पुराच्या घटननंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी देशभरातून एक महिन्याचा (Pune) निधी जमा करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविला होता. या गडबडीत पक्षाला मिळालेल्या देणग्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यायला आठवडाभर उशीर झाला. माहिती उशिरा दिल्याचा दंड दहा हजार रुपये आहे.

Maval : कोथुर्णे येथील पीडित मुलीला न्याय मिळाल्याचे समाधान, पीडितेच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ देणार – आमदार शेळके

मात्र, आता आठ वर्षांनी ही बाब कोदून काढत या विषयात आता पक्षाला नोटीस पाठवून 210 कोटी रुपयांचा दंड बजावला आहे. हा दंड भरला नाही म्हणून विभागाने काँग्रेस पक्षाची चार बँकांतील 11 खाती गोठविली आहेत. आता दहा रुपयांचा व्यवहारही आम्हाला करता येणार नाही. विजयाचा आत्मविश्वास गमावलेले मोदी निवडणुकीत आमचा पराभव व्हावा म्हणून हे करत आहेत. ही कसली लोकशाही? असा संतप्त सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. सीताराम केसरी खजिनदार असतानाच्या काळात 1994 मधील त्रुटीची नोटीस पक्षाला बजावण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळेल पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील त्याचे काय? असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.