Mahalunge : सहकारी कामगारावर चाकूने वार; एकास अटक

एमपीसी न्यूज – सहकारी कामगारावर (Mahalunge) चाकूने वार करत कामगाराला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी महाळुंगे येथील सुप्रजीत प्रा ली या कंपनीत घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सचिन गोरख चव्हाण (वय 20, रा. महाळुंगे, ता. खेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय अबधाशरन दोहरे (रा. निघोजे. ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

LokSabha Elections 2024 : दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून सुविधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण गुरुवारी सकाळी कामावर आले. त्यानंतर सकाळी त्यांची क्वालिटी विभागाची मिटिंग सुरु झाली. त्या मिटिंग मध्ये आरोपी देखील होता. मिटिंग सुरु असताना आरोपीने चाकू काढून ‘काल मला शिव्या का दिल्या’ असे म्हणत त्याने सौरभ दुपडे या कामगारावर वार केले. त्यानंतर हे भांडण सोडविण्यासाठी चव्हाण यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने (Mahalunge) चव्हाण यांच्यावर देखील वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपीपासून वाचण्यासाठी चव्हाण पळून जात असताना त्याने चव्हाण यांच्या पाठीवर देखील वार केले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.