Bhosari Crime News : चॉकलेट आणि पैशांच्या आमिषाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; 68 वर्षीय नराधमास अटक
एमपीसी न्यूज – एका 68 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सावन गंगाराम डोळस (वय 68, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 29) दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 10 वर्षीय मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. मुलीला आडबाजूला झाडामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले.
तसेच मुलीला मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.