Pune Corona Update : शहरात नवीन 215 कोरोना रुग्णांची नोंद; 446 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्येत सध्या कमालीची घट होताना दिसत आहे. शहराच्या विविध भागातील नवीन 215 कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 446 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 342 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 59 हजार 868 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 540 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 215 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.
पुणे कोरोना अपडेट : गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी २०२२
◆ उपचार सुरु : १,५४०
◆ नवे रुग्ण : २१५ (६,५९,८६८)
◆ डिस्चार्ज : ४४६ (६,४८,९८६)
◆ चाचण्या : ३,४९० (४४,७६,१८२)
◆ मृत्यू : २ (९,३४२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/tIqj0HIhgh— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 24, 2022
तर, शहरात आज दिवसभरात 3 हजार 490 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 44 लाख 76 हजार 182 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख सध्या उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.