Today’s Horoscope 06 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
- शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
- आज विशेष — सामान्य दिवस.
- राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – आर्द्रा 09.20 पर्यंत नंतर पुनर्वसू.
- चंद्र राशी – मिथुन.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- तांबडा)
आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अतिशहण्यांशी वाद घालू नका. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो.
वृषभ- ( शुभ रंग – मोतिया)
आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे. शब्द जरा जपून वापरा.
मिथुन- ( शुभ रंग – क्रीम)
योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.
कर्क ( शुभ रंग- पांढरा)
काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज गरजेपुरतेच बोला.
सिंह- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.
कन्या – (शुभ रंग- हिरवा)
अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.
तुळ – (शुभ रंग- जांभळा)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चव चाखता येईल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.
वृश्चिक- (शुभ रंग- आकाशी)
आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.
धनु- (शुभ रंग- चंदेरी)
व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.
मकर- ( शुभ रंग- निळा)
नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.
कुंभ – ( शुभ रंग- भगवा )
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.
मीन- ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.
!! शुभम भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)