Talegaon Dabhade : बबनराव दाभाडे यांचे निधन
एमपीसी न्युज – सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे स्थापनेपासूनचे कार्यकारी व्यवस्थापक, सेवानिवृत्त संघटनेचे विद्यमान अध्यक्ष (Talegaon Dabhade) बबनराव विष्णू दाभाडे (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, तीन मुली, सुन, नातवंडे,पतवंडे, पुतणे असा परिवार आहे.
ते DOD डेपो येथे कामाला होते. त्या ठिकाणी कामगार नेते म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त संघटनेची जबाबदारी घेतली. तसेच सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कार्यकारी व्यवस्थापक म्हणून 36 वर्ष कामाची जबाबदारी स्वीकारली.सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना दैनिक पुढारी मावळ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच समाजकार्यात सक्रिय असल्यामुळे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
PCMC News : महापालिकेच्या 204 बालवाड्यांमध्ये देणार सकस पोषण आहार
जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक खांडेभराड यांचे सासरे, युवा उद्योजक विनोद दाभाडे यांचे वडील व संचालिका रूपाली दाभाडे यांचे ते सासरे होत. (Talegaon Dabhade) आज सायंकाळी 4 वाजता कोटेश्वरवाडी येथे इंद्रायणी नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.