PCMC News : महापालिकेच्या 204 बालवाड्यांमध्ये देणार सकस पोषण आहार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) शिक्षण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या 204 बालवाड्यांमध्ये सकस पोषण आहार (कोरडा शिधा) देण्यात येणार आहे. बालवाड्यांतील एकूण 7 हजार 700 विद्यार्थ्यांना हा आहार दिला जाणार आहे.

या कामासाठी आधीच्या निविदेची मुदत संपल्याने नव्याने ई-निविदा काढण्यात आली आहे. पुढील दोन वर्ष कालावधीसाठी म्हणजे एप्रिल 2025 पर्यंत या कामासाठी नवीन मुदत निश्‍चित केली आहे. निविदा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बालकांना पोषण आहार मिळू शकणार आहे. त्यामध्ये प्रति विद्यार्थी 4 खजूर, 2 शेंगदाणा लाडू, 2 डिंक लाडू, 1 नाचणी बिस्कीटचा छोटा पुडा (50 ग्रॅम), 1 पारले बिस्कीटचा छोटा पुडा (50 ग्रॅम), 2 राजगिरा लाडू असा आहार दिला जाणार आहे. आठवड्यात प्रत्येक दिवशी कोणता आहार द्यायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे कोटी 13 लाख 91 हजार रुपये इतक खर्च निश्‍चित करण्यात आला आहे.

Pune News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करत धारदार शस्त्रानं केले वार, पुण्यातील मंडई परिसरातील घटनेने खळबळ

याबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, महापालिकेच्या बालवाड्यांतील विद्यार्थ्यांना कोरडा आहार दिला जाणार आहे. (PCMC News) आधीच्या निविदेची मुदत संपल्याने नव्याने ई-निविदा मागविली आहे. या निविदेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बालवाड्यांतून हा आहार देण्यास सुरुवात होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.