Sangvi : सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी
एमपीसी न्यूज- नवी सांगवी (Sangvi) येथील एका वकिलाला सोशल मीडियाच्या तीन वेगवेगळ्या अकाउंट वरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.25)रात्री व मोबाईल वरून उघडकीस आला.
Chinchwad : कारची दुचाकीला धडक; महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी रोहन बाळासो जमादार(माळवदकर) (वय 28 राहणार नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी(दि.28) फिर्याद दिली असून दोन फेक इंस्टाग्राम आयडी व फेक फेसबुक अकाउंट वरून धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना दोन इंस्टाग्राम अकाउंट वरून व एका फेसबुक अकाउंट वरून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या यावरून सांगवी (Sangvi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.