Chikhali : आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी RRR केंद्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चिखली येथील आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी RRR ( रिडयूस,रियुज आणि रिसायकल) केंद्राचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

Sangvi : सांगवीतील वकिलाला सोशल मीडिया वरून जीवे मारण्याची धमकी

यावेळी आरोग्य विभागाचे सहा. आयुक्त यशवंत डांगे, स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयक तथा प्रशासन अधिकारी सोनम देशमुख, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सहाय्यक आरोग्याधिकारी शांताराम माने, मॅट्रिक्स जनवाणी आयईसी संस्थेचे प्रतिनिधी, कृष्णकुंज महिला बचत गटातील महिला यावेळी उपस्थित होते.

फ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र. १ चिखली येथील आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरुपी RRR ( रिडयूस,रियुज आणि रिसायकल) केंद्र स्थानिक बचतगट कृष्णकुंज महिला बचत गट यांना प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी देण्यात आले. या केंद्राची स्थापना टाकावू पासून टिकावु या संकल्पनेतुन करण्यात आली आहे.

कृष्णकुंज बचतगटातील महिला नागरिकांकडुन जुने साहित्य जसे कपडे, ईवेस्ट, पुस्तके, खेळणी, चप्पलबुट, पर्स, सॅक इ. या आरआरआर केंद्रावर संकलित करुन या वस्तूंचे नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नविन उत्पादने तयार करणार आहेत. या वस्तूंच्या विक्रीतुन बचतगटास आर्थिक सबलीकरण होणार आहेत आहे. फ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभाग व जनवाणी आयईसी संस्था यांचे सहकार्य व मार्गदर्शन या बचतगटास असणार आहे.

यापुढे अशाच प्रकारे कायमस्वरुपी RRR ( रिडयूस,रियुज आणि रिसायकल) केंद्र प्रत्येक प्रभागामध्ये स्थापन करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिल्या आहेत. या केंद्राकरीता नागरिक व बचतगटांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.