Chinchwad : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ‘बॅकलेन’चे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) महापालिकेमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून प्रेमलोक पार्क या रहिवाशी भागातील बॅकलेन पेंटिंग करुन स्वच्छ व सुंदर असे केलेले आहे. या बॅकलेनचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Chikhali : आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी RRR केंद्र

आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, स्वच्छ भारत कक्षाच्या समन्वयक सोनम देशमुख, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधिर वाघमारे, मेट्रीक्स, ऑल इंडीया इन्स्टीटयुट आयईसीचे प्रतिनिधी व प्रेमलोक पार्कचे नागरिक यावेळी उपस्थित होते.

ब क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १७ येथे आदर्श बॅकलेन निर्मिती आणि लोकार्पण करण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत येणारा महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक घटक म्हणजे बॅकलेन! रहिवाशी अथवा व्यावसायिक ठिकाणांच्या मागील बाजुचा रस्ता अथवा परिसर बॅकलेन स्वच्छ व सुंदर ठेवणे हा सुशोभिकरणाचा उद्देश आहे.

अशाचप्रकारे शहरातील इतर बॅकलेन नागरिकांनी सुशोभित करावेत आणि वापरात आणावेत असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी केले. नागरिकांच्या इतर दैनंदिन समस्यांवरही येथील पालिकेच्या विरंगुळा केंद्रात चर्चा करण्यात आली. यावेळी महिला रहिवासी यांनी येथे गल्ली-क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.