Pimpri : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या बाल वारकऱ्यांचा विठू नामाचा जयघोष

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशीनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सांगवीतून काढलेल्या दिंडीने सांगवी परिसर विठ्ठलमय झाला होता. टाळ, मृदुंग, ढोल, ताशांचा गजर व विठुरायाच्या नामघोषात बाल वारकरी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, भक्तिगीते, हरिपाठ, अभंग सादर केले.

Chinchwad : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ‘बॅकलेन’चे लोकार्पण

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल वारकऱ्यांसोबत या वारीत संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, संगीता घाटगे, शिक्षिका ज्योती मोरे, निलम मेमाणे, अश्विनी वाघमारे, निकिता अडसूळे, सुमित्रा कुंभार, लखविर कौर, दर्शना बारी, कविता मुदलियार, नीलम सावंत, प्रीती पितळे, स्वाती तोडकर, सुनिता ठाकूर, अक्षय नाईक, निलिमा नायडू, भटू शिंदे, उदय फडतरे, पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीची प्रतिकृती तयार करीत नृत्य, पारंपरिक फुगडया, रिंगण यांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत वारीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केलेली होती.

अनेक बालचमूंनी संतांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, टाळाच्या प्रात्यक्षिकातून फुगडी, बैलगाडी, कमळ फुगडी, वारकरी दहीहंडी, वारकरी पैलवान फुगडी, तसेच अभंग सादर केले. यामध्ये शिक्षकही सहभागी झाले होते.

संस्थेच्या अध्यक्षा राव यांनी सांगितले, की सर्व मतभेद विसरून आपुलकीने एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे वारी. तर संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी सांगितले, की व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारी. यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही, म्हणून कोणताच अहंकार अंगी बाळगू नका, असे आवाहन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.