Traffic News : चांदणी चौकात गर्डर उभारण्यासाठी महामार्गावरील जड वाहतूक तीन तास बंद

एमपीसी न्यूज – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48वर 4 ते 15 जुलै या कालावधीत चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी दररोज रात्री साडेबारा ते साडेतीन या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक (Traffic News) ठराविक ठिकाणी थांबवली जाणार असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले आहेत.

Pimpri : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या बाल वारकऱ्यांचा विठू नामाचा जयघोष

चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्गावरील अवजड वाहतूक तीन तास थांबवण्यात येणार आहे.

मुंबईकडून येणारी जड वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथे व मुंबई-पुणे जुना महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे टोल नाका येथे थांबवली जातील.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून चारचाकी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे व चांदणी चौक विवा हॉटेल या मार्गाने कात्रजकडे जातील.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे ब्रिज ते राधा चौक या दरम्यान येणारी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिजमार्गे जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.