Dehuroad : पैशांच्या वादातून चुलत्यास मारहाण; दोघांना अटक
एमपीसी न्यूज – पैशांच्या वादातून पुतण्या आणि भावाने एकास बेदम मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी देहूगाव माळवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संभाजी शांताराम बाळसराफ (वय ५६, रा. देहूगाव, माळवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळकृष्ण शांताराम बाळसराफ, योगेश राजाराम बाळसराफ (Dehugaon) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Khed : जाब विचारल्याने भंगार व्यावसायिकास मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी बाळसराफ हे त्यांच्या शेतात ज्वारी राखत होते. तिथे त्यांचा पुतण्या योगेश आला. त्या दोघांमध्ये कर्जासंदर्भात बोलणे सुरु होते. त्यावेळी बाळसराफ यांचा भाऊ बाळकृष्ण तिथे आला. त्याने शिवीगाळ करून बाळसराफ यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर बाळसराफ आणि त्यांच्या पत्नी शेतातून पळून घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून योगेश याने ‘तुला आज संपवून टाकणार आहे’ असे म्हणत त्यांना काठीने आणि दगडाने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. देहूरोड (Dehugaon) पोलीस तपास करीत आहेत.