Chikhali : लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली, कोयता, लाठी-काठीने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये (Chikhali ) जुंपली आहे. या भांडणात मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. याप्रकरणी तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे.

याप्रकरणी इरफान मोहम्मद खान (वय 34 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीउद्दीन उर्फ समसू झिनकू खान (वय 18), शहाबुद्दीन झिनकू खान (वय 23 रा.चिखली), उस्मान नशीबउल्ला खान (वय 20) या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शमशुद्दीन खान, महिला आरोपी, कुतबुद्दीन खान,रियाज उद्दीन खान, आजार उद्दीन खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Railway : पुणे ते मुझफ्फरपूरसाठी दहा उन्हाळी विशेष गाड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला समशुद्दीन खान याच्या लहान मुलाने  मारले होते. याचा जाब विचारायला फिर्यादी व त्यांची बहीण गेली होती. यावेळी या वादाचे रुपांतरण भांडणात झाले व आरोपींनी एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. फिर्यादी देखील या घटनेत गंभीर जखमी झाले असून चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास (Chikhali ) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.