Bhosari : रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – मोटारीची वाट पाहत थांबलेल्या तरुणाच्या हातातील 86 हजारांचा मोबाईल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सायंकाळी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

हेमंत शरदचंद्र श्रीनिवास वेलूरी (वय 30, रा. जय कृष्ण पूरम, जि. गोदावी, आंध्रप्रदेश) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हेमंत यांनी ऍपद्वारे मोटार बुक केली. ते जे ब्लॉकमध्ये मोटारीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील 86 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.