Nigdi : उसने पैशाच्या बदल्यात  शरीर सुखाची मागणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-  महिलेने एकाकडे उसने पैसे मागितले असता संबंधित नराधमाने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी पीडितेने निगडी (Nigdi) पोलिसांकडे तक्रार दिली आहे . हा प्रकार मंगळवारी (दि.24)दुपारी निगडी ओटा स्कीम येथे घडला.

Chakan: देवाच्या अंगावरील नोटा काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

 पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी असून अण्णा धोत्रे ( रा ओटा स्कीम निगडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रीण या आरोपीकडे उसने पैसे घेण्यासाठी गेल्या यावेळी त्यांनी पैसे मागितले असता आरोपीने फिर्यादी यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यामुळे फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
तसेच पोलिसात तक्रार दिली तर बघून घेईन अशी धमकी ही आरोपीने दिली. यावरून निगडी (Nigdi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.