Chinchwd : चिंचवड रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी अनुभवला मॉकड्रीलचा थरार

एमपीसी न्यूज – रेल्वे स्थानक आणि रेल्वेमधील गर्दीचा फायदा घेत अचानक आतंकवादी लोकल रेल्वेमध्ये घुसले आणि त्यांनी लोकल ट्रेन हायजॅक केली, तर त्यावेळी आपली सुरक्षा यंत्रणा त्यातून प्रवाशांना कशा प्रकारे वाचवतील? याचा थरार रेल्वेप्रवाशांनी अनुभवला. हा थरार आज (मंगळवारी) चिंचवड रेल्वे स्थानकावर दुपारी दीडच्या सुमारास मॉकड्रीलच्या निमीत्ताने नागरिकांना अनुभवता आला.

रेल्वे पोलिसांना कॉल आला की, काही आतंकवादी चिंचवड रेल्वे स्थानकावरील लोकलमध्ये घुसले असून त्यांनी रेल्वे त्यांच्या ताब्यात घेतली आहे. मग काय, अवघ्या काही मिनीटात 15 ते 20 जवानांनी हातात रायफल घेत संपूर्ण लोकलला वेढा दिला. श्‍वानपथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहीका अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. अचानक रेल्वे पोलिसांनी फायरिंग सुरु केले. यामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, तर एकाला त्यांनी जीवंत पकडले.

सारा प्रकार पाहनू नागरिक काहीकाळ गोंधळले. मात्र, हे रेल्वे पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे सांगताच साऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. यावेळी उपस्थित जवांनानी मॉकड्रीलचे कारण सांगत नागरिकांनाही अशावेळी कोणती काळजी घ्यावी, जवानांना कसे सहकार्य करावे. याबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.