Vehicle Theft: कंपनी समोरून पार्कींगमधली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनी समोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी अडीच ते मंगळवारी (दि.22) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत टाटा मोटर्स मटेरियल गेटच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये घडली.

हेमंत राजधर निकम (वय 31, रा. घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत क्षितिजा डोके प्रथम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी टाटा मोटर्स मटेरियल गेटच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केली आणि ते कामावर गेले. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.