Karuna Sharma : संसारात ढवळाढवळ केल्याप्रकरणी करूणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – करुणा शर्मा मुंडे (Karuna Sharma) यांच्यावर पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत तिच्या पतीशी अनैतिक संबंध ठेवून अश्लील शिवीगाळ तसेच जातीवाचक शिवीगाळ आणि पतीकडून तिचा छळ केल्याच्या आरोप आहे. 
या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून, करुणा मुंडे या स्वतःला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सांगत होत्या. त्यानंतर त्या चर्चेत आल्या.

 

याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार करुणा मुंडे आणि महिलेचा पती यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहित या मूळच्या पुण्यातील आहेत. त्याचा विवाह उस्मानाबाद येथील एका तरुणाशी झाला होता. त्या पतीसोबत राहत होत्या. त्यांना एक मुलगी देखील झाली. त्यांचा संसार सुरू असताना त्यांच्या पतीची ओळख ही करुणा मुंडे (Karuna Sharma) हिच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांच्या पतीचे त्यांच्यासोबत वागणे प्रचंड बदलले. तो कायम करुणाशी फोनवर बोलत असत. तर रात्रीअपरात्री फिरायला जात होता. त्यामुळे त्यांनी पतीकडे विचारणा केली असता त्याने तक्रारदार यांना शिवीगाळ करत आमचे प्रेम संबंध आहेत, असे सांगत मारहाण केली.

 

तत्पूर्वी तो उस्मानाबाद येथून पत्नीला घेऊन पुण्यात स्थायिक झाला. पण, त्याचे कुटुंबाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. तो अधूनमधून घरी येत असत. त्यावेळी तो करुणा मुंडे (Karuna Sharma)  हिचे नाव घेऊन त्यांना धमकावत होता. तर मला तू नकोस मला करुणा हिच्यासोबत राहायचे आहे, असे म्हणून त्याने घटस्फोट द्यावा यासाठी सतत त्रास दिला, मारहाणही केली. काही दिवसांपूर्वी घरी आल्यानंतर त्याने पत्नीशी पुन्हा वाद घालत जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला.

 

Pune Crime News : कोरेगाव पार्क परिसरातील आणखी एक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, आठ महिलांची सुटका

विरोध केला असता अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो निघून गेला. पण परत आला नाही. त्याला फोन केल्यानंतर करुणा मुंडे ही फोन उचलत असत तसेच तक्रारदार यांना शिवीगाळ करून पतीचा नाद सोड म्हणत. तसेच त्याला त्रास दिला तर महागात पडेल, अशी धमकी देत होती. तर आम्ही लग्न करणार आहोत. तू नाद सोड. मी पार्टी प्रेसिडेंट आहे, अश्या धमक्या देऊन घटस्फोट देण्यासाठी वारंवार धमकावले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर पतीने विवाहितेला भोसरी येथे कार्यक्रमासाठी म्हणून नेले.

 

त्याठिकाणी देखील करुणा मुंडे उपस्थित होती. त्यावेळी करुणा मुंडेने (Karuna Sharma)  हॉकीस्टीकने धमकावत जातीवाचक शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पती घरी सोडण्यास येत असताना त्याने देखील करूनाच्या नादी लागू नको म्हणून धमकावले. तर तुझ्यावर पाळत ठेवून असून घर बाहेर पडण्यास बंदी घातली असल्याचे म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.