Pune Crime News : कोरेगाव पार्क परिसरातील आणखी एक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, आठ महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी आठ पीडित महिलांची सुटका (Pune Crime News)   केली तर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.  

 

Pune Crime News : खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितल्याने विक्रेत्याला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

 

किरण चंद्रकांत कोळी (वय 29), मोहम्मद हुसेन, मुकुल घुले, अनुज कुमार राकेश पांडे, अब्दुल बतेनी आणि सोनबा निगडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोरेगाव पार्क परिसरातील ली ब्युटी स्पा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

 

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क परिसरातील नोर्थ लिबर्टी मेन रोडवरील ली ब्युटी स्पा या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता आठ पीडित महिला वेश्या व्यवसाय करत असताना आढळून आल्या. जास्त पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.