Pune Crime News : खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितल्याने विक्रेत्याला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यानंतर चार जणांच्या टोळक्याने विक्रेत्याला बेदम मारहाण (Pune Crime News)  केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

MPC NEWS PODCAT : 20 June 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

 

 

 

हरीश गोरखे,  गणेश कोळी,  दत्ता सावंत आणि विशाल कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पाणीपुरी विक्रेता रामवकील मोहनसिंग कुशवा (वय 26) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील माळी दडपाळे चौकात फिर्यादी यांची पाणीपुरी विक्रीची गाडी आहे. शनिवारी रात्री फिर्यादी हे पाणीपुरी विक्री करत असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी पाणीपुरी खाल्ली. फिर्यादीने पाणीपुरीचे पैसे मागितले असता आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत भांडणे (Pune Crime News)  करून त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी हरीश घोडके याने त्याच्याकडील लोखंडी कोयता उलटा करून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. चतुशृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.