Pune Crime News : फुकट आंबे न दिल्याने मार्केटयार्डात व्यापार्‍याला ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – फुकट आंबे न दिल्याने आणि सुरक्षा रक्षकाकडे तक्रार केल्याने एका आंबे व्यापाऱ्याला चार जणांनी ब्लेडने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Pune Crime News) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मार्केटयार्ड परिसरातील केळी मार्केट येथील 44 क्रमांकाच्या गाळ्यावर हा प्रकार घडला. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

 

 

याप्रकरणी अबु कलाम आजाद (वय 32) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी फईन खान (वय 19),  सुरज भिसे (वय 19), करण लोंढे (वय 21) आणि महेश साबळे (वय 19) यांच्यावर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत; भाई जगताप की प्रसाद लाड होणार विजयी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या मार्केटयार्ड येथील दुकानात बसले होते. यावेळी आरोपी त्याठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी यांना आंबे व आंब्याचे कॅरेट मागितले. फिर्यादीने पैसे दिल्याशिवाय आंबे मिळणार नाहीत असे म्हणाल्याने आरोपी यांनी तुमची मार्केट यार्ड कमिटीकडे तक्रार करीन अशी धमकी दिली.

 

 

 

 

 

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या भावाने गेटवरील सुरक्षारक्षकडे तक्रार केल्याने आरोपीने चिडून तुम्ही बाहेरून येऊन येथे पैसे कमवता, तुम्हास आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणून फिर्यादी यांच्या भावांना लाथाबुक्क्यांनी (Pune Crime News)  मारहाण केली. ब्लेडने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.