Ravet News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत शारीरिक संबंधास नकार दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑक्टोबर 2021 ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रावेत येथे घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनोद विजय मिस्त्री (रा. सोलापूर) याच्यावर गुन्ह दाखल केला आहे.

Mobile Theft : हातावर कोयत्याने वार करत पळवला मोबाईल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा विश्वास संपादन करत त्याचा मित्र ओंकार (पूर्णनाव माहित नाही) यांच्या रुमवर नेऊन आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच यापुढे शारीरिक संबंधाना नकार दिला तर पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.