Mobile Theft : हातावर कोयत्याने वार करत पळवला मोबाईल

एमपीसी न्यूज –नागरिकाच्या हातावर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कोयत्याने वार करत जखमी केले व त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार निगडीतील यमुनानगर परिसरात शुक्रवारी (दि.18) रात्री घडला.

Rajgurunagar News: स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत 2 आरोपींना मोठ्या शस्त्रसाठयासह केले जेरबंद

अजय विठ्ठल ढोले (वय 48 रा. वडगाव शेरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पांढऱ्या स्कूटीवरून आलोल्या दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आरोपी आले. दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला. तोच वार फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर ही ओझरता बसला. फिर्यादी यांना काय झाले कळायच्या आत चोरट्यांनी त्यांच्या हातातील 5 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.