Rajgurunagar News: स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत 2 आरोपींना मोठ्या शस्त्रसाठयासह केले जेरबंद

एमपीसी न्यूज : स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत 3 गावठी पिस्टल, 6 मॅगझीनसह तब्बल 30 जिवंत काडतुसे जप्त करीत 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

  • आकाश आण्णा भोकसे वय 23 वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे
  • महेश बाबाजी नलावडे वय 23 वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे
  • रविवार, २० नोव्हेंबर २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर साहेब यांच्या आदेशाने खेड राजगुरुनगर या परिसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम काळया रंगाचे बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याचे समजले सदर बातमीची खात्री करून घेण्यासाठी त्याठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील २ इसमांना ताब्यात घेतले.

    Nawale Bridge Accident: कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 48 गाड्यांचे नुकसान, 38 प्रवासी जखमी

    या दोघांची अंगझडती घेतली असता आकाश याचे कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस 2 लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले तसेच त्याचे पॅन्टच्या खिशात 2 मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश याचे याचे कंबरेला 1 गावठी पिस्टल मॅकझीन सह मिळून आले. त्याचे पॅन्ट च्या खिशात 1 जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली. सदरील दोन्ही ईसमांकडून 3 गावठी पिस्टल आणि 3 मॅकझीन, प्रत्येकी 5 जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी 5 जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली

    • एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझिन सह काळया रंगाचे. की. अं .रू 35000
    • एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह काळया रंगाचे. की. अं .रू 35000
    • एक लोखंडी गावठी पिस्टल मॅकझीन सह सिल्वर रंगाचे. की. अं .रू 35000
    • 30 जिवंत काडतुसे की अं रू = 3000
    • एक काळया रंगाची नंबर नसलेली बुलेट मोटारसायकल की अं रू. 50,000
    • ३ रिकाम्या मॅकझीन की अं रू =3000
      असा एकूण 1 लाख 61 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील आरोपी यांचे विरूद्ध सरकारतर्फे फिर्याद देऊन आर्म ॲक्ट 325 नुसार खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदरील आरोपी यांना मुद्देमाल सह पुढील तपास कामी खेड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

      सदरील कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो श्री अंकित गोयल सो*अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे सो,पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,स पो नी नेताजी गंधारे,पो स ई शिवाजी ननवरे, पो स ई गणेश जगदाळे, पो हवा विक्रमसिंह तापकीर, पो हवा विजय कांचन, पो ना अमोल शेडगे, पो ना बाळासाहेब खडके, पो शि धिरज जाधव, पो शि निलेश सुपेकर, पो शि दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.

    MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.