Tamhini Ghat news: ताम्हिणी घाट जवळील प्लस व्हॅलीमधील बुडून एका पर्यटकाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : ताम्हिणी घाट जवळील प्लस व्हॅलीमधील बुडून एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. अजितकुमार कश्यप, रा. बावधन असे मृत पर्यटकाचे नाव आहे. तो खराडी येथील कंपनी मध्ये काम करत होता.

याबाबत अधिक माहिती देताना, पौड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की काल 5 मित्र फिरण्यासाठी ताम्हिणी घाट जवळील प्लस व्ह्याली येथे काल सकाळी गेले होते. ते सर्व 1000 फुट खोल दरीत उतरले. त्यानंतर दुपारी 12.30 वा. चे सुमारास ते एका कुंडाजवळ पोहोचले.

PCMC News: अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे; आयुक्तांनी बसविला मर्जीतील अधिकारी

तेथे अजितकुमार ह्याला कुंडामध्ये पोहण्याची इच्छा झाली त्यामुळे त्याने कुंडत उडी मारली. तो दोन तीन वेळेस पाण्याच्यावर आला व मदतीसाठी ओरडू लागला. त्यामुळे त्याचे 2 ते तीन मित्र त्याला वाचवायला कुंडात उतरले. त्यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. तो त्यांना पाण्यात ओढू लागला व नंतर तो बुडाला.

त्याच्या मित्रानी कुंडापासून थोडे दूर जाऊन मोबाईल फोन वरून 112 वर पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यामुळे पौड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन टिम व रायगडची टिम तेथे पोहोचल्या.

सुमारे 11.30 वा अजितकुमार याचा मृतदेह कुंडाबाहेर काढण्यात आला. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्याच्यावर बावधन येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.

पौड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सचिन शिंदे, पोलीस नाईक ईश्वर काळे, पोलीस नाईक सिद्धेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार हे घटनास्थळी मदत कार्य करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.