Tamhini Ghat : अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांच्या उपाययोजना

एमपीसी न्यूज : रायगड जिल्हा पोलिसांनी ताम्हिणी घाट (Tamhini Ghat) परिसरातील कोंडेथर गावातील ज्या ठिकाणी आज कारचा भीषण अपघात झाला; तेथे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अशी माहिती रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

पाटील म्हणाले, की आज ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या डोंगर माथ्यावर गाड्या दरीजवळ जाऊ नयेत, यासाठी चर खोदण्यात आला आहे. तेथे रुंबलर स्ट्रिप्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून गाड्यांचा वेग कमी होईल. तसेच, तेथे पर्यटकांनी अपघात टाळण्यासाठी करावयाच्या सूचना असलेले सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच यापूर्वीच आज ज्या ठिकाणी अपघात घडला. जवळच क्रॅश बॅरिअर्स पूर्वीच लावण्यात आले आहेत.

Khed : निमगाव दावडीत कालवा फुटला, सर्वत्र पाणीच-पाणी!

देवकुंड हे तेथील धबधब्यामुळे व नयनरम्य (Tamhini Ghat) निसर्गामुळे कोकणातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे जवळच्या पुणे जिल्ह्यातून व इतर ठिकाणांवरून पर्यटक येथे वर्षाविहारासाठी येत असतात. 5 युवक व ड्राइव्हर असे मिळून एकूण 6 युवक (सर्व राहणार मंगरूळपीर, जिल्हा वाशीम) हे काल पुण्यावरून देवकुंडला वर्षाविहारासाठी जात असताना ते फोटो काढण्यासाठी कोंडेथर गावातील एका डोंगर माथ्यावर थांबणार होते. पण, ब्रेक मारताना त्यांची कार निसरड्या जागेवरून खाली 500 फूट खोल दरीत पडली व त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले. पण सुदैवाने ते वाचले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.