Anand Bhoite : चक्क पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्तांनी स्वतः बुजवले खड्डे

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Anand Bhoite) यांनी शनिवारी किवळे येथील रोडवरील स्वतः खडी टाकून खड्डे बुजवले आहेत.

शनिवारी दुपारी अधूनमधून पावसाची रिपरिप चालू होती. किवळे येथील मुकाई चौकातील उड्डाणपुलावरून व पुलाखालून वाहनांची ये-जा सुरू होती. पण, या उड्डाण पुलाच्या बाजूच्या रोडवर पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत सर्व वाहने जात होती. पण, खड्ड्यांमुळे आदळत व अडकत होती. वाहन चालकांना ही वाहने बाहेर काढताना कसरत करावी लागत होती. तसेच, यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Tamhini Ghat : अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांच्या उपाययोजना

या परिस्थितीत वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Anand Bhoite) हे त्यांच्या गाडीतून देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेट देण्यासाठी जात होते. त्यांना या रस्त्यावरील खड्डे व आदळताना दिसली. त्यांना लक्षात आले, की या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी लगेच पुलाच्या भिंतीकडेला बांधकामाची पडलेली माती उचलली आणि स्वतःच्या हाताने खड्डे भरू लागले. थोड्या वेळाने त्या मार्गावरून देहूरोडच्या दिशेने निघालेले मानव अधिकार संरक्षण संघटनेचे मावळ तालुका उपाध्यक्ष रज्जाक शेख यांनी हे पाहिले आणि त्यांनी त्यांच्या रिक्षातून आणखी खडी आणून खड्डे भरण्यास मदत केली. त्यामुळे अपघात होण्याचा धोका टळला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे असले तरीही कर्तव्यदक्ष व सामाजिक बांधिलकी जपणारे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी खड्डे बुजविण्याचे काम स्वतः केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.