Today’s Horoscope 22 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 August 2022

वार – सोमवार

22.08.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस

आज विशेष – अजा एकादशी

राहू काळ – सकाळी 07.30 ते 9.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल

आजचे नक्षत्र – मृग 07.41 पर्यंत नंतर आद्रा

चंद्र राशी –  मिथुन

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – तांबडा)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो.आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो.

वृषभ – (शुभ रंग – मोतिया)

आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचाही प्रभाव पडेल.भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने काही मतभेद होण्याची शक्यता आहे.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील.मीपणा  सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे.कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल.आज गरजूंच्या कमी याल.बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे.आज गरजेपुरतेच बोला.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल.विरोधक नमते घेतील.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)

अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे.मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तुळ – (शुभ रंग – जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे.अविश्रांत मेहनतीनंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची आणि वैयक्तीक हानी होऊ शकेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु – (शुभ रंग – चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी विश्वासदृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल.इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर – (शुभ रंग – निळा)

नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील.ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.

कुंभ – (शुभ रंग – भगवा)

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील.प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.